आंबेडकर का नाम “मजबुरी” है!

नमस्कार,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर! बहुतेक सर्वात जास्त अनुयायी असूनही, तितकेच कठोर टीकाकार लाभलेला भारतीय इतिहासातील एकमेव माणूस. आज मात्र त्यांच्यावर उघडपणे टीका करण्याची हिम्मत भल्याभल्यांची होत नाही. कारण या नावाइतका निवडणुकीत कुणाचाच उपयोग बहुधा होत नसेल. आणि बहुतेक फक्त निवडणुकीतच उपयोग केला जातो. कारण त्यांचे विचार पचवण्याची ताकद कुठल्याच पक्षाकडे नाही. एकदा नेत्यांना अनुयायी मिळाले की त्यांचे अध:पतन सुरु होते. याचे खूप चांगले उदाहरण म्हणजे गांधीजी होत. त्यामानाने बाबासाहेबांची परिस्थिती चांगली आहे. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि जातीय शोषणाखाली दबलेल्या अशा सर्वांसाठी, ते एक बंडखोरीचे प्रतिक आहे.

या माणसाने विविध क्षेत्रात बरीच कामे केली तरी दलित नेता याशिवाय वेगळी ओळख यांची नाही. To be very specific, आरक्षणाशिवाय आंबेडकरांनी काही केलंय असे कित्येक लोकांना वाटत नाही. आणि हो विसरलोच ते म्हणतात ना, भारतीय राज्यघटना काहीतरी (काही लोकांच्या भाषेत), तिच्या मसुदा समितीचे अध्यक्षपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच होते. या राज्यघटनेला (आणि आंबेडकरांना) लपून छपून दोष देणारे बरेच आहेत. ही राज्यघटना सादर करतानाचे बाबासाहेबांचे एक वाक्य आठवते. “ही राज्यघटना कितीही चांगली असली तरी तिला वापरणारे लोक प्रामाणिक नसतील तर ती वाईट ठरेल आणि राज्यघटना कितीही वाईट असली तरी तिला वापरणारे लोक चांगले असतील तर ती उत्तम ठरेल!”

डॉ. आंबेडकर हे देशातील पहिले डॉक्टरेट घेणारे अर्थतज्ज्ञ आहेत, हे बहुतेक लोकांना माहित नसेल आणि त्यांच्या शेती आणि अर्थविषयक विचारांची योग्य नोंद कुणी घेतली असेल, असेही  वाटत नाही. त्यातली मला काही विशेष उल्लेखनीय वाटतात. सामुहिक शेती करावी असा आग्रह करणारे आंबेडकर होते (आज बहुतेक खाजगी कंपन्या हेच करतात आणि बक्कळ फायदा कमावतात, शेतकरी सरकारकडे मदतीची आस लावून असतात). पाणी आणि वीज या गोष्टी समान वाटल्या गेल्या तरच भारताची सर्वांगीण प्रगती होईल असे त्यांचे ठाम मत होते. आपल्याकडे पाऊस लहरी (वाचा: हरामखोर ;)) असल्याने शेती करताना जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनासारखे व्यवसाय केल्याखेरीज प्रगती होणार नाही (असे आपले पवारकाका पाऊस नाही आला की नेहमी बोलतात), हे आग्रही मत त्यांनी वारंवार मांडले होते.

त्यांनी लोकसंख्या धोरण हे आधीच मांडले होते आणि वाढती लोकसंख्या नियंत्रणासाठी उपायही सुचवले होते. विविध कामगारहक्कविषयक  आणि स्त्रीहक्कविषयक कायदे त्यांनी लोकप्रतिनिधी असतानाच संमत करून घेतले होते. ज्या हिंदू कोड बिलासाठी त्यांनी राजीनामा दिला, त्यातल्या सुधारणा आणि कायदे टप्प्याटप्प्याने नंतर संसदेने संमत करून घेतले! त्यातले बरेचसे कायदे स्त्रियांच्या भल्यासाठीचे आहेत, हे तर सामान्य स्त्रिया सोडा, स्त्री शक्ती संघटना म्हणवून घेतलेल्यांनाही ठाऊक नसेल. हे कायदे आजच्या स्त्रियांना जास्त उपयोगाचे आहेत.

खूप आधीच त्यांनी भारताची जलनीती मांडली. आजची नदी प्राधिकरणे त्याचाच भाग आहे. नदीजोड प्रकल्पाची कल्पना त्यांनी मांडली होती. पाणी ही संपत्ती राष्ट्राची आहे आणि म्हणून आपण राष्ट्रीय जलधोरण ठरवले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. आज राज्या-राज्यांमधले पाणी तंटे बघितले की याचे महत्व कळून चुकते. (कालच ऐकले की पुढची भारत-पाकिस्तान लढाई पाण्यावरून होईल म्हणून!) अशी दूरदृष्टी त्या काळी क्वचितच कुणाकडे होती. अशा माणसाला फक्त दलित नेता म्हणून ओळखतात हे दुर्दैव कुणाचे हे कळत नाही.

भाषाविषयक राज्यांबद्दल आंबेडकरांची मते अगदी स्पष्ट होती.  महाराष्ट्र आणि मुंबई यांचे जे नाते आहे, ते कोणाच्या बापालाही तोडता येणार नाही असे ते म्हणत असत (संदर्भ: मराठा दैनिक). ते १९५५ साली “भाषिक राज्य पुनर्रचना मीमांसा” या लेखात म्हणतात, ‘मुंबईच काही बहुरंगी शहर नाही, मद्रास आणि कलकत्तादेखील बहुरंगी शहरे आहेत. जर कलकत्ता प. बंगालमध्ये राहू शकते, मद्रासही तिकडेच राहू शकते तर मुंबईबद्दल एवढे आकांडतांडव का?’ ते पुढे म्हणतात, ‘ मात्र या समस्येमुळे एक शंका वाटते ती ही की, महाराष्ट्रीय राज्य करण्यास असमर्थ आहे असे कॉंग्रेसश्रेष्ठींना वाटत असावे. मराठी बाण्याचा हा अपमान आहे आणि ते हे कधीही सहन करणार नाहीत.”  (आजही कॉंग्रेसश्रेष्ठींचे तेच मत आहे, असे त्यांचे दिल्लीहून निरीक्षक आले की वाटते. ;))

गांधी-आंबेडकर वैचारिक मतभेद तर जगजाहीर आहेत. त्यामुळे बरेच संघर्षाचे प्रसंग आले आणि त्यात कित्येकदा कॉंग्रेसकडून (पुणे करार) आंबेडकरांना “व्हिलन” ठरवले गेले. गांधीजी म्हणाले होते, “खेड्याकडे चला.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “शहराकडे चला.’ जेव्हा सगळा देश गांधीजी म्हणतील ती पूर्व दिशा मानत होता तेव्हा आंबेडकरांनी सद्सद्विवेकबुद्धीला पटेल तेच केले. आंबेडकरांनी नेहमीच आपली मते परखडपणे मांडली होती. त्यांना एकदा विचारले की “तुमच्या मते १९व्या शतकात भारतात निर्माण झालेला लोकोत्तर पुरुष कोण?” प्रश्न विचारणाऱ्याला बहुतेक गांधीजी हे नाव अपेक्षित असावे. पण बाबासाहेबांचे उत्तर होते, “स्वामी विवेकानंद!” मला नाही वाटत की कुणी यावर वाद घालू शकेल.

आंबेडकरांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल अरुण शौरी यांनी आक्षेप घेतले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून डॉ. य. दि. फडके यांनी ‘डॉ. आंबेडकरांचे मारेकरी-अरुण शौरी’ हे पुस्तक लिहिलंय. यात डॉ. य. दि. फडके यांनी शौरींची मते इतिहासातील संदर्भ देऊन मुद्देसूदपणे खोडून काढलेली आहेत. आज अरुण शौरी यांचे पुस्तक बाजारात मिळते पण  ‘डॉ. आंबेडकरांचे मारेकरी-अरुण शौरी’  हे पुस्तकच गायब आहे, यात काही नवल नाही.

सगळ्याच पक्षांनी त्यांना आपल्या पद्धतीने ‘आपलेसे (?)’ केले आहे, ते पण त्यांची ठरावीक मते स्वीकारून!  निवडणुका आल्या तर बाबासाहेबांविषयी पोकळ का होईना सगळ्या पक्षांना त्यांच्याबद्दल प्रेम दाखवावे लागते. डाव्यांनी त्यांना कास्ट लीडर ठरवले (हे डावे तर बंगालमध्ये देवपूजा करून ‘धर्म ही अफूची गोळी आहे’ असे म्हणणाऱ्या कार्ल मार्क्सलासुद्धा फाट्यावर मारतात! ) तर उजव्यांना  त्यांची ठराविक मतेच आवडतात. (ती पण मुसलमानांवर  टीका केलेली! ) काहींना ते प्रात: स्मरणीय वाटतात, कॉंग्रेसला पण असेच काहीतरी वाटते. राज तर बोलतो, तुम्ही बाबासाहेबांना जातीत मोजणार का? ते मराठी होते.  आता बोला.

बाबासाहेबांच्या नेतृत्वाला एक तात्विक जोड होती. लोकांचे नेतृत्व करताना तत्वे गुंडाळून ठेवावी लागतात, ह्या सिद्धांताला त्यांनी नेहमीच केराची टोपली दाखवलीय. त्यामुळे ते मला उत्तुंग वाटतात. त्यांचे एक वाक्य मला नेहमी आठवते, “माझी निष्कारण स्तुती करून मला देवपणाला  चढवू नका. देवपणाच्या  नादी लागलेली माणसे मला कमकुवत मनाची वाटतात.”

आज सगळेच पक्ष आणि त्यांचे बुळबुळीत विचारवंत त्यांची महती गातील आणि एकसुरात म्हणतील, “जितने के लिये जरुरी है, आंबेडकर का नाम मजबुरी है!”

आजच्या निगरगट्ट नेत्यांनाही ‘मजबूर’ करणाऱ्या या नेत्याला आपला सलाम!

अविनाश.

Comments
 1. Atul Thakur

  Nice one! Liked the article. Its so unfortunate that his thirst for knowledge and inclination towards education was not taken ahead much by his desciples. It was his education and knowledge that first made the lasting impression on the conservative minds. No one from higher caste could ever neglect him because he was GREAT scholar! And far ahead than those people in every walk of life.

 2. Must say: solid and effective writting hey yeh!!!!
  The first paragrah itself tells lot many things…
  My best wishes to u
  Regards,
  Manish

 3. Absolutely stunning article bro.!

 4. Amit Limbaskar

  छान लिहितोस अविनाश !!
  keep it up

 5. Vaibhav Gaikwad

  You know, the way you write….is really awesome…..
  that’s why everyday when I open the firefox…..the first thing I check is the RSS from your blog….
  About this article….its clear, straight to the point…..
  gives satisfaction of reading something actually worth thinking….
  keep it up…..
  (sorry Amit….stealing your line….)

 6. कबुली: मलापण आंबेडकर हे फक्त दलित नेते (आणि भारतिय राज्यघटना लिहणारे) म्हणूनच माहित होते.
  आपली ईतिहासाची पुस्तकंपण “आंबेडकर” ह्या शब्दाची अशीच व्याख्या करतात. “एकदा नेत्यांना अनुयायी मिळाले की त्यांचे अध:पतन सुरु होते.” खास… १००% खरं आहे. ज्यांना (माझ्यासारख्यांना) आंबेडकरांबद्दल माहिती नसेल त्यांना (सध्या आंबेडकर जयंती ज्या जल्लोषात साजरी करतात ते पाहून) आंबेडकरांबद्दल काही आदरभाव नसेलच. त्यांच्या अनुयायांनीच आंबेडकर == मजबुरी असा (सम)अर्थ लावून दिला आहे. असो. तुझ्या ह्या लेखाने आंबेडकरांच्या निळाईची एक वेगळीच छटा पहाता आली. And I must say its a brilliant writeup. I shall recommend it to others to read this. It helped me to have high respect about this Great man…
  by the way if you get the book of Dr. Y. D. Phadake let me know, would love to read more about him…

 7. चेतन सकपाळ

  article was very informative, for me i.e….
  अजून बरच काही जाणून घ्यायची इच्छा, any suggestions???

 8. Nilesh

  Gr8 thoghts……….amasing presentation…….

  amchyashathi drama lihnar ka…………

 9. sonali mohite

  mast aani zanzanit lihalys . mi pan ambedkerainvar khup pustke vacli ahet . tuz lehan patal mala. asac lihit raha rajkiy netyanchya nakavar tecun

  all the best
  sory khup ushira ha likh vachla.

 10. Pravin Gamre

  Very good article…….keep it up Avinash

 11. dr . ambedkaravishayi evdya sankshiptpane lihun dekhil atishay motha ashy tumchya lekhat disun ala

 12. Amrish G. Urade

  Very nice Article. Here you have told the real meaning of article. It is a fact that every political party in India always takes the name of Dr. Babasaheb Ambedkar during the election time.

 13. Amrish G. Urade

  Excellent article.

 14. Deepali Pawar

  Superb!!!!!!!!! Bravo!!!!!!!! we all are folowers dats Y we know …how great he is? sumtymes feel really pitty on those who has absolutely forgotten him…I m proud to be Dr Babasaheb Ambedakar’s Follower..n my tribute to this great man….Bhartratna Parmpujya babasaheb Ambedkarancha Vijay aso!!!!!
  We all youth shoud come together and spread the importance of this great man , such noble cause he had done in his endevour …I m proud to be Buddhist…my salute to thise 2 great Personalities..Gautam Ratna Budha and aple baba….
  Grt article buddy..kp it up..i m impressed….

 15. Prathamesh

  hey bro khup chan aahe tujha article please try to publish in news paper saadhyachya kalachi garaj aahe lokana mahiti nahi Dr.BR Ambedkar kon aahe ani kai vekti mhatva ahe tey .just evdach mahiti aahe ki reservation tayne anla ,ani nela zenda yancha pakshaycha aahe ,Lazz vatyla havi sadhyachya rajkarni lokana ,janteney nako tya lokana mohtey keley ani dokyaavr basavla ahe taynchi puja karta aahet ani jey deserve kartat tyana just election chya veli baher kadaycha.
  Dude pan please please try to publish this article in the news paper .otherwise give me permission i will publish with ur name dont worry but try to reach this article to people as much as we can
  JAI BHIM ,JAI BUDDHA

 16. Dr. Sanjiv Gaikwad

  चांगला अभ्यासपूर्ण व सर्वच भारतियांच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख आहे. आयु. अविनाश यांना माझी विनंती आहे की हा लेख त्यांनी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करावा.

 17. Dr. Sanjiv Gaikwad

  डौ. य. दि. फ़डकेंच्या पुस्तकाविषयी खूप जणांना कल्पना नाही. (यात मी देखील आहे. ) कॄपया हे पुस्तक कुठे उपलब्ध असेल ते सांगावे. मी आपला आभारी राहीन. जयभीम.
  डौ. संजीव गायकवाड

 18. Prathamesh

  me majhaya facebbok profile var taku ka tujha article without any editing same jsut i want to spread this article i like it very much

 19. It’s Very Real and Nice.

 20. kamble vinod bhaskar

  aaj jo majkur vachala to khup changla hota pan khant vatte ti majburi ka shabthe vaparlat

 21. vikas

  JAIBHIM AVINASH,
  Everyone know he is the great man, actually i like ur articles and i would like to joined you for your next articles.

 22. Sachin S Surwade

  सर आज मी बहुतेक हा लेख ४थ्या – ५ व्यांदा वाचला असेल पण आज पण तेवढाच उत्साह येतो वाचल्यावर…!!!!!
  Please keep writing something or the other about the Great Man sir….

 23. Pramod Sitaram Pawar

  Nice One Avinash..
  I post ur article on my post with ur name..
  sorry for not take ur permission for that..
  but i like to this article read my my friends who are in my circle
  Bye & Ambedkar Jayantichya Advance madhye Shubhechhya..

 24. Sudhirkumar Dhanvijay

  very nice man

 25. prashant

  Hi!!!!!!!!!!!!!!
  Avinash very very nice

 26. vidyadhar karad

  babasaheb yanche bddl brich mahati nvin vanyas milhali , babasahebanchya vichyarane v dakhvlelya vathen srakarne vath chal kyas khup pragti hoel ! very nice

 27. Jay Bhim

 28. Archana

  This is the reality of real man who loves humanity. He did all task to save Human being .
  very informative article . you should publish it. We exited
  to share this article.
  Keep it.

 29. shailesh wagh

  Gr8 article … I would love read ur insights on the topic of gandhi vs aambedkar thinking and vision

 30. kamble vijay w.

  R/sir
  saprem jaibhim
  U`r writing is very nice

ADD YOUR COMMENT